पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हस्तलिखितांचा संग्रह
 बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेत सध्या ३१ हजार हून अधिक हस्तलिखितांचा संग्रह आहे. यामध्ये सर्व विषयांची, विविध भाषेतील व निरनिराळ्या लिपीत लिहिलेली जवळजवळ २७ विषयांवरील हस्तलिखिते उपलब्ध आहेत. बहुतांश हस्तलिखिते देवनागरीत असली तरी संस्कृतसह मराठी, गुजराथी अशा अन्य आठ लिपीतील हस्तलिखिते सुद्धा येथे आहेत. हस्तोद्योगातील कागद, पट्ट (कापड), भुर्जपत्र, ताम्रपत्र, ताडपत्र इ. प्रकारची हस्तलिखिते येथे पाहवयास मिळतात. अलीकडच्या काळात इतर संस्थांमधून महत्त्वाच्या हस्तलिखितांच्या छायांकित प्रती मिळवून हा संग्रह अधिक समृद्ध झाला आहे. हस्तलिखितांच्या फोटोप्रती तयार करणे हे एक महत्त्वाचे काम असते. यासाठी १९२३ मध्ये बडोदा संस्थानतर्फे या संस्थेला अमेरिकन बनावटीचा छायांकनाचा कॅमेरा (आजच्या भाषेत झेरॉक्स मशीन) देण्यात आला.

 भारतात १९४० पर्यंत ग्रंथालयांना हे तंत्रज्ञान परिचितही नव्हते. हे मशीन दिवसाला १०० ताडपत्रावरील हस्तलिखितांच्या फोटोप्रती करून देत असे. अगदी १९४५ पर्यंत हे मशीन उत्तम सेवा देत असे. अभ्यासकांना हव्या त्या हस्तलिखितांच्या छायांकित प्रती देण्याची व्यवस्था येथे करण्यात आली होती. पोथ्यांमध्ये महाकाव्ये, वेद, पुराणे, स्मृती, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरण, साहित्य, ज्योतिष दर्शनशाखा, कामशास्त्र, छंदः शास्त्र,वास्तु- - शिल्पकला, तंत्रके वाङ्मय, बौद्ध वाङ्मय, संगीत

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १९