पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यासारख्या विविध विषयांवरील पोथ्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) आर्थिक साहाय्याने बहुतांशी हस्तलिखितांचे व दुर्मिळ पुस्तकांचे २०१०-११ दरम्यान प्रतिमीय संगणकीकरण झाले आहे. प्राच्यविद्या संस्थेच्या ग्रंथालयाची सेवा विनामूल्य उपलब्ध होती. प्राच्यविद्या संस्थेतील वस्तू, चित्रे, हस्तलिखिते इ. चे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी उपलब्ध होणे हे एक या संस्थेचे खास वेगळेपण सांगता येईल.
 अगदी अलीकडचा संदर्भ म्हणजे २०१९ मध्ये राम जन्मभूमी निश्चित करण्याच्या खटल्यात अलाहाबाद हायकोर्टात वाराणसीच्या 'श्री राम जन्मभूमी पुनरुद्धार समितीने जे ‘अयोध्या माहात्म्य'चे हस्तलिखित पुरावा म्हणून सादर केले होते. ते १९२७ पासून बडोदा प्राच्यविद्या संस्थेत संरक्षित केले आहे. हे ३६४ वर्षांपूर्वीचे हस्तलिखित आहे. पुढे प्राच्यविद्या संस्थेने हस्तलिखित ग्रंथांच्या चार सूची An Alphabetical List of Manuscripts in the Oriental Institute Vol. I-IV पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या असून या सूचीमध्ये एकूण २५,००० पोथ्यांचे विवरण करण्यात आले आहे.
भाषांतर शाखा
भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात भाषांतराचेमहत्त्व जाणणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचेभाषांतरासंदर्भातील

कार्य लक्षात घेऊन मातृभाषेला ज्ञानभाषा करणाऱ्या या द्रष्ट्या राजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इंग्रजी

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २०