पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रामायणाच्या 'The Valmikis Ramayana Part 1 to 7'बडोदा आवृत्तीचा आधार घेतला आहे. या ग्रंथाचे वेगळेपण असे की या ग्रंथात रावणाची लंका म्हणजे आत्ताची श्रीलंका हा सिद्धांत खोडून तिचे स्थान मध्यप्रदेश असल्याचा सिद्धांत मांडला आहे. प्राचीन भारताच्या अधिकारी इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी आगाशे यांच्या या मांडणीची दखल घेत तिचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
 बडोदा प्राच्यविद्या संस्थेची दोन नियतकालिके होती. यापैकी १९५१ मध्ये इंग्रजी भाषेतील 'Journal of Oriental Institute' हे नियतकालिक सरू करण्यात आले. १९६२ मध्ये गुजराथी भाषेत 'स्वाध्याय' हे नियतकालिक सुरू करण्यात आले. आजअखेर प्राच्यविद्या संस्थेने गायकवाड ओरिएन्टल सिरिजमध्ये १८७ ग्रंथ, श्री सयाजी साहित्यमालेत ३८०, सयाजी ग्रामविकासमालेत ३६, मातुश्री जमनाबाई स्मारक ग्रंथमालेत ०८, श्री सयाजी बालजनमाला - २१३, श्री शिशुजनमाला - ०८, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ओरिएन्टल सिरिज - २५, क्रिटीकल एडिशन ऑफ रामायण ०७, क्रिटीकल एडिशन ऑफ विष्णुपुराण ०२, क्रिटीकल एडिशन ऑफ मार्कंडेयपुराण २ असे एकूण ८६८ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

 आजपर्यंत ८६८ पेक्षा अधिक विविध भाषासाहित्य, संस्कृती, धर्म, ज्ञान, विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व, संगीत, कृषी,

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३१