पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १) बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही बुद्ध धर्मावरील सर्वाधिक मूळ ग्रंथ प्रकाशित करणारी संस्था आहे.
 २) सयाजीरावांनी या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदांना सर्वाधिक साहाय्य केले.
 ३) २७ विषयांच्या हस्तलिखितांचा संग्रह असणारी बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही आधुनिक भारतातील आजअखेरची एकमेव प्राच्यविद्या संस्था आहे.
 ४) १० ग्रंथमाला प्रकाशित करणारी बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही आधुनिक भारतातील आजअखेरची एकमेव प्राच्यविद्या संस्था आहे. पंजाबच्या विश्वेश्वरानंद विश्वबंधू इंस्टीट्यूट ऑफ संस्कृत इंडोलॉजिकल स्टडीज संस्थेच्या तीनही ग्रंथमाला १९५० नंतर सुरू झाल्या.
 ५) बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही रामायणावरील समीक्षात्मक ग्रंथमाला सुरू करणारी आधुनिक भारतातील पहिली प्राच्यविद्या संस्था आहे.
 ६) बडोद्याची प्राच्यविद्या संस्था विष्णुपुराण व मार्कंडेयपुराण या पुराणांवरील समीक्षात्मक ग्रंथमाला सुरू करणारी भारतातील पहिली प्राच्यविद्या संस्था ठरते. पंजाबच्या विश्वेश्वरानंद विश्वबंधू इंस्टीट्युट ऑफ संस्कृत इंडोलॉजिकल स्टडीज या संस्थेकडून वैदिक ग्रंथावरील समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती.

 ७) आपल्या संग्रहातील हस्तलिखिते, वस्तू, चित्रे इ. चे प्रदर्शन जिज्ञासूंना मोफत उपलब्ध करून देणारी बडोद्याची प्राच्यविद्या

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३३