पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याचे अधिकारी बी.एल. गुप्ता यांनी आक्षेप घेतला. बी.एल. गुप्ता यांनी ‘व्हाईटनॅक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण खाते सध्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम करू शकत नसल्याचे’ मत नोंदवले.
 १५ फेब्रुवारी १९१६ रोजी व्हाईटनॅक यांनी बडोद्याचे दिवाण मनुभाई मेहता यांना पत्र लिहून दरमहा १,२५० रु. वेतनावर बडोद्यात काम करण्यास तयार असल्याचे कळवले. याच पत्रात व्हाईटनॅक यांनी बडोद्यातील सुधारणांशी तुलना करत भारताच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर ग्रंथ लिहिण्याची इच्छा व्यक्त के ली. अखेर १३ एप्रिल १९१७ रोजी सयाजीराव महाराजांनी व्हाईटनॅक यांच्या बडोद्यातील नियुक्तीला मान्यता दिली. या आदेशात सयाजीराव लिहितात, “मी शक्यतो मंत्र्याच्या शिफारशी मान्य करतो. आपल्या वाढत्या प्रशासकीय गरजांच्या पूर्ततेसाठी उत्तम इग्रं जी येणाऱ्या युरोपियन किंवा अमेरिकन व्यक्ती अत्यावश्यक आहेत असे आपल्याला वाटते. व्हाईटनॅक यांना तुलनेने अधिक वेतन द्यावे लागणार असले तरी त्यांना बडोद्याची माहिती असल्याने मी त्यांच्या नियुक्तीला समं ती देतो.” संस्थानच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रसगं ी परदेशातून उच्चशिक्षित मनुष्यबळ मिळवण्याची सयाजीरावांची धडपड यातून स्पष्ट होते.
 अखेर १९१८ मध्ये सयाजीरावांनी व्हाईटनॅक यांची महसल विभागात सहआयुक्त पदी नेमणूक के ली. त्याचबरोबर उत्पादन

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / 14