पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बँक ऑफ बडोदाची वाटचाल
 स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी १९०९ मध्ये बँक ऑफ बडोदाचे खेळते भांडवल ६,९२,७०० रु. पर्यंत वाढले. तर या वर्षी बँकेने २३,८६,१०० रु. इतकी रक्कम सभासदांना कर्ज स्वरूपात दिली. १९०९ मध्ये बडोदा बँकेला ५१,००० रु. नफा झाला. १९११ मध्ये बँक ऑफ बडोदाचे खेळते भांडवल १० लाख रु. पर्यंत पोहोचले. तर नफ्याची रक्कम १,७५,००० रु. इतकी होती. १९११ मध्ये सुमारे ७२ लाख रु.ची कर्जे सभासदांना वितरित करण्यात आली. १९२९ मध्ये बडोदा बँकेचे खेळते भांडवल ३० लाख रु. पर्यंत पोहोचले तर बँकेचा राखीव निधी २३ लाख ५० हजार रु. होता.
 या मजबूत आर्थिक स्थितीच्या आधारे बडोदा बँकेकडून बडोद्यातील केंद्रीय सहकारी बँकेलादेखील आर्थिक मदत पुरविली जात होती. केंद्रीय सहकारी बँका बडोद्यातील विविध सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य करत होत्या. बडोदा संस्थानात बँक ऑफ बडोदाने सर्वप्रथम धनादेशाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे बँकेतील बचत खात्यांना प्रोत्साहन देऊन जनतेमध्ये बचतीची सवय रुजवण्याचा प्रयत्न केला. बडोदा संस्थानच्या किनारपट्टीवर ओखामंडल येथे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक मिठावर प्रक्रिया करून शुद्ध मीठ उत्पादन करण्याच्या उद्देशाने ५ मे १९२७ रोजी ओखा सॉल्ट वर्कची स्थापना करण्यात आली. या कारखान्यात उत्पादित होणारे मीठ बंगालमध्ये मोठ्या

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३३