पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरळीत होण्यासाठी २००५ मध्ये बँक ऑफ बडोदाने मुंबईत ग्लोबल डाटा सेंटर नामक केंद्रीय यंत्रणा उभी केली. २००७ मध्ये बडोदा बँकेने २ अब्ज रु. व्यवसायाचा टप्पा पार केला. यावर्षी बँक ऑफ बडोदा जगभरातील २००० हून अधिक शाखांद्वारे सुमारे २ कोटी ९० लाख हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत होती. २००९ मध्ये न्यूझीलंडमध्ये बँक ऑफ बडोदाची नोंदणी करण्यात आली. २०११ मध्ये दुबईतील शारजा येथे बँक ऑफ बडोदाने इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा विभाग सुरू केला.
 २०२१ मध्ये बँक ऑफ बडोदा १९ देशातील ८५४४ शाखांच्या माध्यमातून सुमारे १४ कोटी ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत आहे. यापैकी ९६ शाखा परदेशात कार्यरत आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील एकूण ८१९२ शाखांमधील सर्वाधिक २८४७ शाखा ग्रामीण भागात कार्यरत आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये सुमारे ८४,२८३ कर्मचारी काम करत असून बँकेच्या १०,००० हून अधिक ए.टी.एम. मशीन्सचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारले आहे.
 त्रिनिदाद आणि घाना या देशात शाखा सुरू करण्यासाठी संबंधित देशांकडून आवश्यक परवानग्या बँक ऑफ बडोदाला मिळाल्या आहेत. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यूझीलंड आणि मालदीवमध्ये शाखा सुरू करण्याची परवानगी बडोदा बँकेला दिली आहे. कॅनडा, श्रीलंका, बहारीन, सौदी अरेबिया आणि रशिया या देशांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा उभारण्याचे काम सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतील अनेक देश, कुवेत,

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४०