पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बँक ऑफ बडोदाच्या उत्तम कार्याची साक्ष या अहवालातून मिळते.
 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या अहवालात तत्कालीन संस्थांनी बँकांचे स्थापना आणि मालकी यानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण खासगी मालकी असणाऱ्या कृष्ण राम बलदेव बँकेची स्थापना ग्वाल्हेरच्या महाराजांकडून करण्यात आली होती. काही संस्थानांमध्ये शासकीय विभागांच्या पूर्णतः अथवा अंशतः नियंत्रणाखालील व्यावसायिक बँकांद्वारे वित्तीय कामकाज पार पाडले जात असे. काही संस्थानामध्ये स्थानिक प्रशासनाने पारित केलेल्या कायद्यांनुसार बँकांचे कामकाज चालवले जात होते. तर याउलट राजाच्या केवळ तोंडी आदेशावरून दुंगारपूर येथील श्री रामचंद्र लक्ष्मण बँकेची स्थापना करण्यात आली होती. या बँकेच्या कामकाजासाठी कोणतेही लिखित नियम निश्चित करण्यात आले नव्हते. संस्थानाने लागू केलेल्या कंपनी अॅक्टअंतर्गत बँकेची नोंदणी करून तिचे कामकाज पार पाडणारी बँक ऑफ बडोदा ही तत्कालीन भारतातील संस्थानांमधील एकमेव बँक ठरते. २०१९ मध्ये विजया आणि देना या दोन बँकांचे बडोदा बँकेत विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बनली.
 बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेसाठी सयाजीरावांनी खासगी सावकार, बडोद्यातील जनता आणि संस्थान यांच्यात समन्वयाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम केला. अमेरिकन

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४५