पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थतज्ज्ञाला या कामाच्या नेतृत्वस्थानी ठेवून स्थापनेपासूनच या बँकेच्या ध्येयधोरणाला आंतरराष्ट्रीय दिशा दिली. व्यावसायिक नफ्याबरोबर समाजातील दुर्बल घटकांप्रति ही बँक स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसते. व्यावसायिक दृष्टिकोनाला समाजकल्याणाची भक्कम जोड या बँकेने दिली असल्याचे दिसते. सयाजीरावांनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या बडोदा संस्थानला संपन्नतेच्या शिखरावर नेले. सयाजीरावांनी जगातील ८ व्या क्रमांकाचा श्रीमंत हा लौकिक मिळवला. समाजविकासाच्या जगभरातील उपक्रमांना आजच्या रुपयाच्या मूल्यात २ लाख २० हजार ८१४ कोटी रु. इतकी मदत दिली. सयाजीरावांनी आपल्या आर्थिक व्यवस्थापनातून जशी संपत्ती निर्माण केली तशी ती योग्य नियोजनाद्वारे जनकल्याणासाठी वापरली. बँक ऑफ बडोदाचा आजचा लौकिक पाहता सयाजीरावांच्या या धोरणाची जोपासना बँक ऑफ बडोदा करत आहे ही बाब अभिमानास्पद ठरते.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४६