पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव

आणि

बँक ऑफ बडोदा

 महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे नवनिर्माणाचे मानदंड होते. त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली असता याचे अनेक पुरावे सापडतात. त्यांनी कोणतेही काम हाती घेत असताना पूर्वतयारीला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. वेदोक्त करण्याअगोदर त्याची बौद्धिक तयारी करण्यासाठी सयाजीरावांनी ४-५ वर्षे घेतली. बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्याअगोदर १०-१२ वर्षे त्यासाठीची तयारी केली. १९०६ ला बडोदा राज्यात सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याअगोदर २४ वर्षे म्हणजे १८८२ पासून महाराजांनी या कामाचा आरंभ करून, येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून या कायद्याच्या परिपूर्ण अंमलबजावणीची काळजी घेतली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या समाजाला आधुनिकतेच्या प्रवाहात घेऊन जात असताना हजारो वर्षांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी महाराज प्रजेला मानसिक तयारीसाठी वेळ देत, त्यांच्या प्रबोधनासाठी

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ६