पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीवपूर्वक प्रयत्न करत. याचे प्रमुख कारण असे होते की, कोणताही उपक्रम उत्तम पद्धतीने पुढे जाण्यासाठी तयारीसुद्धा मुळातून आणि सर्वसमावेशक असावी लागते.
 या पार्श्वभूमीवर महाराजांनी १९०८ मध्ये स्थापन केलेल्या बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेचा इतिहास विचारात घेतला तर या पूर्वतयारीची आपल्याला कल्पना येईल. राज्यातील शेती आणि उद्योग यांना बळकटी देणे हा बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेमागील महाराजांचा मुख्य उद्देश होता. महाराजांनी आपल्या राज्यातील सुधारणांची सुरुवात धार्मिक सुधारणांनी केली, तीही आपल्या राजवाड्यापासून. त्यानंतरचा दुसरा टप्पा हा सामाजिक सुधारणांचा होता. धार्मिक आणि सामाजिक सुधारणांशिवाय आधुनिक उद्योग आणि शेती यांचा विकास नाही हे इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. या संदर्भात समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा 'Protestant Ethics and Spirit of Capitalism' हा ग्रंथ जिज्ञासूंनी पाहावा. ख्रिश्चन धर्मातील कॅथॉलिक हा परंपरावादी पंथ इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या मार्गातील अडथळा होता. तर प्रोटेस्टंट हा सुधारणावादी पंथ इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीला कसा उपकारक ठरला याचे सिद्धांतन वेबर यांच्या वरील ग्रंथात आढळते.
 १८८१ ला राज्यकारभार हाती आल्यापासून ते १९०८ ला बँक ऑफ बडोदाची स्थापना करेपर्यंत महाराजांनी केलेल्या

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ७