पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८९८ मध्ये सयाजीरावांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीविलास राजवाड्यामध्ये "ग्रंथ संपादक मंडळी'चा पहिला वार्षिक समारंभ साजरा झाला. १७ फेब्रुवारी १९३० रोजी महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्यांची व्याख्याने लोकांसाठी मुद्दाम ठेवली होती. त्यावेळी महाराज स्वत: हजर होते. यामध्ये एक सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून २०० रु. रोख दिले. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचे ‘क्षत्रिय व त्यांचे अस्तित्व' हे पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले.
धर्मसमन्वयाचा अनोखा मानदंड

 लक्ष्मीविलास राजवाड्याच्या सभोवतालची ६५० एकर जागेतील बाग तयार करताना ब्रिटिश, युरोपियन, फ्रेंच, हिंदू, मुघल व रजपूत बाग निर्मिती शैलींचा विपुल प्रमाणात वापर केला होता. फ्रेंच बॅरोक शैलीतील बागेत स्थानिक वृक्षांचा वापर करून फ्रेंच देखावा तयार करण्यात आला. राजवाड्याची बाहेरील बाजू संपूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. सयाजीरावांनी लक्ष्मीविलास राजवाड्याच्या शिखरावर हिदू, इस्लाम, ख्रिश्चन यांसह ७ धर्माची तत्वे कोरून घेतली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सयाजीरावांनी या राजवाड्याचे केलेले कौतुकच लक्ष्मीविलास पॅलेसचे अनन्यत्व सिद्ध करते. महाराज म्हणतात, “पॅलेसचे बांधकाम व कलाकुसर मात्र उजवी आहे. अर्थात लक्ष्मी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १७