पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बांधलेला लक्ष्मीविलास राजवाडा म्हणजे त्यांचा ध्येयवाद, विशाल दृष्टी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. परंतु अगदी सुरुवातीपासूनच या ऐश्वर्याला वैराग्याचे अधिष्ठान होते. महात्मा गांधींनी 'विश्वस्त' ही संकल्पना मांडण्याअगोदर महाराज ती शब्दश: जगले होते. राज्यसूत्रे हाती घेतली तेव्हा बडोदा संस्थान आर्थिकदृष्ट्या संकटात होते. महाराजांनी हे संस्थान कल्पकतेने, स्वकष्टाने, सर्वक्षेत्रातील ज्ञानी लोकांच्या सहकार्याने तसेच आर्थिक व्यवस्थापनाचा मानदंड निर्माण करून जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत नेऊन ठेवले. हे सर्व करत असताना मनाने मात्र 'आपण या संपत्तीचे विश्वस्त आहोत' हीच धारणा ते जगले. यासंदर्भात पुढील उदाहरण बोलके आहे. १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हीरकमहोत्सवानिमित्त 'सयाजीराव तिसरे डायमंड ज्युबिली ट्रस्ट फंडा' ची स्थापना महाराजांनी केली. याद्वारे समाजविकास आणि मुख्यत: आदिवासी आणि अस्पृश्य यांच्या उन्नतीसाठी एक कोटी रुपयाचा निधी महाराजांनी आपल्या खाजगी फंडातून राखून ठेवला होता.

 राजर्षी ही पदवीसुद्धा महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना फारच छोटी वाटते. कारण महाराजांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या-त्या क्षेत्रातील आदर्शाच्या प्रस्थापित मानदंडांच्या कक्षा इतक्या विकसित केल्या की त्यातून नवे मानदंड निर्माण झाले. महाराजांच्या सेवेत असणारे महत्त्वाचे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / २१