पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस

 महाराजा सयाजीराव म्हणजे वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला यांचे वैश्विक भान असणारे जाणकार होते. १८८७ च्या पहिल्या परदेशवारीपासूनच ते या कलांचा तुलनात्मक विचार करत होते. त्यांच्याकडे नावीन्याची ओढ होती. जे काम करायचे ते सर्वोत्तम झाले पाहिजे ही दृष्टीसुद्धा होती. त्यामुळे महाराजांच्या कारकीर्दीत महाराजांच्या काळात उभारलेल्या सर्वच वास्तू वास्तुकलेचा आणि सौंदर्यदृष्टीचा सर्वोच्च आविष्कार होता. १८८१ ला महाराजांना राज्याधिकार प्राप्ती झाली. त्या अगोदर एक वर्ष या राजवाड्याचे बांधकाम खास त्यांच्यासाठी सरू करण्यात आले. आजही या वास्तू जगभरातील पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे.
 महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द समजून घेण्याच्या प्रवासातील प्रत्येक दिवस महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील नव्या पैलूंचे दर्शन घडवितो. या प्रवासातील अनेक टप्पे सुखद आनंद देऊन जातात, तर काही टप्पे प्रतिभावंत

राजाची ओळख करून देतात. सयाजीरावांनी त्यांच्या ५९

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / ६