पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांच्या प्रशाकीय कारकीर्दीत बडोदा ससं ्थानात अनेक वास्तूंची निर्मिती के ली. या वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांच्या परदेश प्रवासाचे प्रतिबिंब जागोजागी निदर्शनास येते. महाराजांच्या प्रत्येक नवनिर्मितीमागील बहुउद्देशीय कल्पना आणि त्यातील नावीन्यता आजही सर्वांना आकर्षित करतात. याचाच एक उत्तम नमुना म्हणजे बडोद्याचा लक्ष्मीविलास राजवाडा. १४२ वर्षांपूर्वी बडोद्याच्या जगप्रसिद्ध लक्ष्मीविलास राजवाड्याची पायाभरणी झाली होती. हा राजवाडा म्हणजे आधुनिक भारताचा नवा मानदडं निर्माण करणाऱ्या अनेक उपक्रमांची ‘पंढरी’ आहे.

लक्ष्मीविलास राजवाड्याची पायाभरणी

 लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामास १२ जानेवारी १८८० मध्ये सरुु वात झाली. दहा वर्षांनंतर १० फेब्रुवारी १८९० रोजी सयाजीराव या राजवाड्यात वास्तव्यास गेले. इगं ्लंडच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या Buckingham Palace, England च्या चौपट मोठा हा राजवाडा आहे. हा लक्ष्मीविलास राजवाडा एकूण ७४४ एकर इतक्या जागेवर विस्तारला आहे. राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची अंदाजे २०४ फूट असनू राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ ६०,००० स्क्वेअर फूट आहे. राजवाड्याची उत्तर दक्षिण लांबी ५१२ फूट असनू पूर्वपश्चिम रुं दी २०० फूट आहे. १९ व्या शतकात तत्कालीन ब्रिटिश भारतात पौरात्य पद्धतीने बांधलेली राजवाड्याची एवढी मोठी

इमारत इतर कुठे ही आढळत नाही. महाराजांच्या पहिल्या पत्नी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / ७