पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहण्यासाठी ख़ासगी दालने असनू दुसऱ्या मजल्यावर शयनागार आणि राजपाहुण्यांची दालने आहेत. महाराजांच्या विभागाच्या दक्षिण भागी महाराणी चिमणाबाईचें निवासस्थान होते. त्याचे प्रवेशद्वार स्वतंत्र ठे वण्यात आले होते. तसेच त्यांना स्वतंत्र दिवाणखाना होता. तो लक्ष्मीविलास पॅलेसचा चौथा मुख्य भाग होय. तसेच याच राजवाड्यात दवाखाना, जमादारखाना, बिलियर्ड रूम, गादी महल हे राजवाड्याच्या पूर्व भागात होते.
 राजवाड्याच्या बांधकामासाठी आग्रा येथील लाल दगड, पुणे येथील निळे दगड आणि राजस्थानमधील सगं मरवरी दगडांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. राजवाड्यातील भिंतीवर प्लास्टर करण्यासाठी मद्रासहून कामगार बोलवण्यात आले होते. दरबार हॉलमध्ये व्हेनेशियन पद्धतीचे सगं मरवरी दगडावरील नक्षीकाम बसवण्याचे काम व्हेनिसमधील मुरानो कंपनीचे १२ कामगार १८ महिने करत होते. दरबार हॉलमधील खांब, दरवाजे आणि जिन्याच्या पायऱ्यांवर बसवण्यासाठी कारारा प्रकारचा सगं मरवर दगड आयात करण्यात आला होता. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामात करण्यात आलेला काचेचा वापर हा तत्कालीन भारतातील एखाद्या वास्तूसाठीचा सर्वात जास्त वापर होता. रंगकाम के लेल्या या काचांवर भारतीय पौराणिक कथांची चित्रमालिका रेखाटण्यात आली होती.
 युरोपप्रवासात सयाजीरावांनी पाहिलेल्या खाजगी वापराच्या विविध पाश्चात्य वस्तू व राहणीमानाच्या विविध पद्धतींचे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / 9