पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इ. स. १९१८ मध्ये नवयुगात प्रकाशित झालेल्या 'आमची देशी संस्थाने' नावाच्या लेखमालेत वासुदेव तळवळकरांनी बडोद्यातील वास्तुकलेच्या आविष्काराचे चित्तवेधक वर्णन केले आहे. त्यामध्ये तळवलकर लिहितात, “पूर्वीचे बडोदा आणि आताचे बडोदे यात जमीन आस्मानचा फरक आहे. आपले राजधानीचे शहर सालंकृत दिसावे याबद्दल सयाजीराव महाराजांनी नगरबदलाकडे स्वतःच्या हौशीने लक्ष पुरविले आहे. जनतेच्या सोयी पाहताना कलेची दृष्टी आणि प्रगतीची दिशा डोळ्यांपुढे ठेवल्यामुळे पूर्वीच्या वनास आज नंदनाची शोभा आणता आली. स्टेशनपासून मांडवीपर्यंत आल्यास रस्त्याने आजूबाजूस ज्या इमारती दिसतात, त्यांनी शहराला किती सौंदर्य प्राप्त करून दिले आहे, त्याचा विचार मनात उद्भवतो. सुरसागर तलावाच्या उत्तरभागी उभे राहा आणि समोर दिसणारे दृश्य बघावे. समोर मिडल स्कूल, फिमेल ट्रेनिंग कॉलेज यांच्या इमारती आहेत. पूर्व बाजूला जरा आडवी अशी न्यायमंदिराची भव्य इमारत, पश्चिमभागी असलेले फिमेल ट्रेनिंग कॉलेजचे बोर्डिंग, हे पाहताना महाराजांनी हा परिसर किती सुंदरतेने सजविला आहे, याची सत्यता पटेल. याच जलाशयाच्या पूर्वभागी मोठासा बगिचा आणि उत्तरभागी एक भव्य इमारत पुढे मागे होण्याचा संभव आहे, असे त्यांचे नियोजन होते. यातून या परिसराची शोभा द्विगुणित होणार आहे. अशाच प्रकारचा दुसरा एक भाग ते सजवित गेले. स्टेशनवरून निघाले की, पहिल्यांदा हायस्कूलची इमारत आहे. तेथून जरा पुढे आले की, मोठी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ११