पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळी असून त्यावर अगदी छोटे छज्जे आहेत. ही जाळी बघताना आग्र्याच्या ताजमहालची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथे खिडक्या असून त्यावर उत्कृष्ट दगडी कोरीवकाम केले आहे. राजवाड्याचा दर्शनी भाग शिल्पकलेने ओतप्रोत भरला आहे. हे शिल्पकाम मिश्र स्वरुपात केलेले दिसते. त्यात हिंदी शिल्पकला पध्दत वापरली असून, त्यातील काही कमानीत व्हेनिसची शिल्पकला व काही गॉथिक शिल्पकलेचा मिलाप बघावयास मिळतो. मुख्य दरबाराच्या दिवाणखान्याची फरशी व्हेनिसच्या पध्दतीची असून त्यानर इटालियन शिल्पकार फेलीची याने चित्रकला, काव्यकला, मूर्तिकला व शिल्पकला या चार ललितकलांचे दर्शक पुतळे उभे केले आहेत.
 तसेच मुख्य दरवाजाला महिरप आहे. त्यावरही सुंदर कोरीव काम केलेले आहे. दरवाजाची जी महिरप आहे तिच्यातील समांतरपणा व त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन उंच मनोरे व त्याला असलेल्या चौफेर बालकन्या (balconies) तर प्रवेशदाराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. मध्यभागी असलेल्या अर्धगोलाकृती घुमटाच्या टोकावर असलेला भगवा झेंडा गायकवाड सरकार राजमहालात हजर असल्याची साक्ष देतो. महाराजांचे वास्तव्य जेव्हा राजवाड्यात असे, त्यावेळी लक्ष्मीविलासच्या उंच मनोऱ्यावर

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १७