पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. मकरपुरा (१८९०)
 महाराज खंडेराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बडोद्यापासून ४ मैल दूर असलेला मकरपुऱ्याचा राजवाडा शिकारीच्या सोयीसाठी म्हणून बांधला होता. पुढे १८८३ मध्ये महाराजा सयाजीरावांनी त्यांच्या कारकिर्दीत या राजवड्यातील एक भाग नवीन सुधारीत पध्दतीने बांधून घेतला. तो १८९० साली पूर्ण झाला. याचे नकाशे मि. स्विझम यांच्याकडून तयार करून घेतले
होते. हा राजवाडा विटबांधकामात बांधला आहे. हा राजवाडा इटालियन रेनीसॉन्स ( renaissance) म्हणजे प्रबोधनकाळाच्या धर्तीवर बांधला आहे. या राजवाड्याभोवती जापानी पध्दतीची बाग असून त्यात संगमरवरी कांरजे, सभा मंडप, ठिकठिकाणी पूर्णाकृती पुतळे (Life size), भोवताली हिरवेगार अंगण आणि

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २१