पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विविध फुलांचे सुंदर ताटवे पसरले होते. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. महाराजांनी या सुंदर बागेची रचना करण्याचे काम विलायतेतील सुप्रसिध्द बागवान मि. गोल्डरिंग यांच्यावर सोपविले होते.
३. प्रतापविलास पॅलेस (१९०८)
 प्रताप विलास पॅलेस चे बांधकाम १५ फेब्रुवारी १९०८ रोजी सुरु झाले आणि ३० जुलै १९१४ रोजी पूर्ण झाले. हा पॅलेस बडोदा - दभोई रेल्वे भागाच्या दक्षिणेला लाल बागे जवळ असल्याने त्यास लालबाग पॅलेस असे ही म्हणत. कालांतराने
Pratap Vilas Palace त्याला बरोद्याच्या शेवटच्या राज्यकर्त्याच्या नावाने “प्रताप विलास पॅलेस" म्हणून ओळखले जाऊ लागले. खास युवराज

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २२