पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. बडोदा महाविद्यालय (The Maharaja Sayajirao University of Baroda) (१८७९)
 बडोदा कॉलेजची इमारत १८८३ मध्ये बांधून पूर्ण झाली. त्यावर सुमारे ८ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. शिल्पशास्त्रज्ञ मि. चिझम यांनी या इमारतीचा नकाशा तयार केला होता. या इमारतीचे मुख्य आकर्षण म्हणजे याचा घुमट. हा घुमट सॅरसेनिक म्हणजे मुसलमानी वास्तुकला शैलीचा आहे.
 भारतात विजापूरचा गोल घुमट हे एक उदाहरण आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा घुमट बडोदा कॉलेजच्या इमारतीचा आहे. या घुमटाच्या आतील भाग विविध बांधकामाच्या शैलीत बांधला आहे. हा गोल घुमट हिंदुस्थानात इंग्रजी सत्ता प्रस्थापित

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २६