पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Seyaji Boug (Kamati baug) पशुपक्षी लोकांना आकर्षित करतात. या बागेत चित्रसंग्रहालय (Picture Gallery ), वादन मंदिर (Band Stand) वगैरे इमारतींचा समावेश आहे. या बागेत श्वेत मंदिर (Whit Pavilion) असून ते वगळता सर्व भाग लोकांच्या वापरासाठी खुला ठेवण्यात आला आहे. या बागेत फुलांचे घड्याळ बसवण्यात आले आहे. फुलांचे घड्याळ ही हिंदुस्थानातील पहिलीच निर्मिती होती. या घड्याळात तास, मिनिट आणि सेकंदाचा हात असून तो २० फूट (६.१ मीटर) व्यासाच्या डायलवर फिरतो. घड्याळ हलविणारी यंत्रणा भूमिगत आहे, घड्याळाला नैसर्गिक स्वरूप देण्यात आले आहे. या बागेचा उपयोग लोकांचे आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रमासाठी केला जातो.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २८