पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. संगीत महाविद्यालय (अॅग्लो व्हर्नाक्युलर शाळा )
(१८८६)
 महाराजांनी बडोद्यात सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. त्यासाठी ॲग्लो व्हर्नाक्युलर ही शाळा बांधण्यात आली. या शाळेत त्यावेळी पहिली ते चौथी पर्यंत मराठी, गुजराती, उर्दू या भाषा शिकविल्या जात होत्या. उस्ताद मौलाबक्ष खाँ यांना महाराजांचा आश्रय होता.
1875 :- Anglo-Vernacular School Now Music Collage
महाराजांच्या हुकुमावरून बडोद्यात उस्ताद मौलाबक्ष खाँ साहेब यांनी गायनशाळा सुरू केली. या गायनशाळेचे वर्ग नंतर अॅग्लो व्हर्नाक्युलर शाळेत भरू लागले. २६ फेब्रुवारी १८८६

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३१