पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. सर सयाजी जनरल हॉस्पिटल (१८८६)
 इ.स. १८८५ मध्ये महाराणी चिमणाबाई (पहिल्या ) या त्यांच्या पहिल्या बाळंतपणात गुंतागुंतीच्या दुर्धर आजारात मरण पावल्या. या घटनेने महाराज खूप दु:खी झाले आणि याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे कोणत्याही व्यक्तिला आपले प्राण गमवावे लागू नये या विचाराने सयाजीरावांनी अत्याधुनिक सोयी
SSG Hospital 1111
सुविधांनीयुक्त जनरल हॉस्पिटल उभारण्याचे ठरविले. ८ नोव्हेंबर १८८६ ला हे सार्वजनिक रुग्णालय बांधून तयार झाले. त्याचे उद्घाटन व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्या हस्ते करण्यात आले. १८९६ मध्ये महाराजांनी नर्सिंग कॉलेज सुरू केले. हॉस्पिटलच्या मूळ इमारतीच्या आजूबाजूच्या इमारती पाहिल्या की, हे एक

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३३