पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात महाराज म्हणतात, “माझ्या प्रजाजनास शारीरिक स्वास्थ प्राप्त करून देण्याची माझी इच्छा असून त्या कामी त्यांच्या सहकार्याची मला जरूरी आहे. त्यांनी थोडेबहुत पुस्तकी ज्ञान मिळवावे, म्हणजे मला त्यांना विश्वास घेता येऊन आपल्या कामात भागीदारही बनविता येईल. सर्व प्रकारचे कायदे, नियम, सरकारी नेमणूक प्रसिध्द करण्याची माझी इच्छा आहे; पण या माहितीचा उपयोग करून घेण्याइतके शिक्षण लोक घेतील की नाही, हा प्रश्न आहे. मला आशा आहे की, माझे प्रजाजन तितके शिक्षण जरूर घेतील.” (भाषण संग्रह १, भाषण क्र. १३, पान नं. १९)
१२. बडोदा म्युझियम आणि पिक्चर गॅलरी (१८९४)

 बडोदा म्युझियम आणि पिक्चर गॅलरीच्या इमारतीचा नकाशा मेजर मिंट आणि रॉबर्ट चिझम (Major Charles Mant and Robert Chisholm) यांनी तयार केला होता. बडोदा म्युझियमची इमारत १ जून १८९४ साली बांधून पूर्ण झाली. तर बडोद्याच्या पिक्चर गॅलरीचे बांधकाम १९०८ मध्ये चालू झाले. ते १९९४ ला पूर्ण झाले. या विस्तारलेल्या भव्य इमारतीची रचना लंडनच्या व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट हॉल सारखी केलेली आहे. याची रचना इंडो- सॅरसेनिक शैलीचा (Indo-Saracenic) वापर करून केली असून छत्री, तोरण आणि कमानींचाही भरपूर वापर केला आहे. इमारतीचा तळमजला पाहिला की, त्यावरील युरोपियन वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. वस्तुसंग्रहालय आणि चित्रसंग्रहालयात भरपूर
महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३७