पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

BARODA MUSEUM & PICTURE GALLERY प्रकाश आणि खेळती हवा याचे उत्तम नियोजन केले गेले आहे. या संग्रहालयासाठी महाराजांनी स्वतः खरेदी केलेल्या भरपूर वस्तू भेट दिल्या आहेत, शिवाय या दोन्ही संग्रहालयाकरिता नवीन वस्तू व चित्रांच्या खरेदीसाठी खाजगी खात्यातून भरपूर पैसे खर्च केले. बडोद्यातल्या जनतेमधील कलाभिरुची वाढावी आणि विद्यार्थ्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातील कलेचे अवलोकन करून आस्वाद घेता यावा, हाच मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून या भव्य इमारतीची निर्मीती केली होती. महाराजांच्या विचारांमधील व्यापकता येथे दिसून येते. ही दोन मजली इमारत वास्तुविशारद (Architect) लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आली आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३८