पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. सरकारी कचेऱ्या आणि कोठी कचेरी (१९०३ - आताचे जिल्हाअधिकारी कार्यालय)
 ब्रिटीशांच्या अंमलात कोठी कचेरी बांधून झाली होती. नंतर मात्र १८९५ पर्यंत सर्वच कचेऱ्या, पोलीस ठाणी, न्यायमंदिर वगैरे इमारती बांधून झाल्या होत्या. नवसारीची मुख्य कचेरी बांधण्यास त्याच काळात सुरुवात झाली. अमरेलीची मुख्य कचेरी महाराजांच्या कारकिर्दीत मि. चिझन यांच्या निगराणीखाली १८९३ मध्ये बांधून पूर्ण झाली होती. मेहसाणा येथील कचेरीची इमारत मुसलमानी वास्तुकला शैलीत बांधली असून 'मि. स्टिव्हन्स यांनी हे बांधकाम पाहिले होते. या कचेरीचे काम कलात्मक आणि कौतुकास्पद झाले असल्यामुळे या कचेरीला पूर्ण होण्यास १८९३-१९०३ अशी तब्बल दहा वर्ष लागली होती. वाढत्या राज्यकारभारातील प्रशासकीय कामांचे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४२