पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९. बडोदा सेंट्रल लायब्ररी (१९१०)
 बडोदा सेंट्रल लायब्ररी ही भारतातील महत्त्वाची सार्वजनिक लायब्ररी म्हणून ओळखली जाते. ही इमारत १९९० मध्ये बांधण्यात आली. लोकांना जाण्यास सहज शक्य व्हावे म्हणून हे ग्रंथालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच जुन्या शहरात चंपानेर गेटजवळ मांडवी भागात उभारले आहे. ही इमारत भूकंप प्रतिरोधक तसेच कीड/वाळवी प्रतिरोधक केलेली असल्याने इथे शेकडो वर्षांपूर्वीचे ग्रंथ चांगल्या प्रकारे जतन केलेले आहेत. भविष्यातील कित्येक पिढीस लाभ घेता येईल हे दूरदृष्टीचे धोरण ठेऊन ही इमारत बांधलेली आहे. २००१ साली सगळ्या गुजरातला भूकंपाचे धक्के बसले होते आणि आश्चर्य

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४९