पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Mobile Library ही कल्पना भारतात महाराजांनी सर्व प्रथम चालू केली. म्हणजे या ग्रंथालयाच्या रॅकमधून एकही पुस्तक जमिनीवर पडलेले आढळले नाही. यावरून या इमारतीच्या बांधकामाच्या कौशल्याची कल्पना येते.
२०. कीर्तिमंदिर (१९१५)
"मरावे परी कीर्तिरूपी उरावे” या म्हणीप्रमाणे महाराजा सयाजीरावांनी आपल्या थोर पूर्वजांच्या कार्याची स्मृती सदैव आपल्याला राहावी या हेतूने १५ जानेवारी १९९५ ला कीर्तिमंदिर उभारण्याचे ठरविले. त्यांनी स्वत: युरोप दौऱ्यात अशी स्मृतीदालने पाहिली होती. आपले कर्तृत्वान पूर्वज, राज्याच्या प्रगतीसाठी योगदान दिलेले ज्येष्ठ मंत्री, दिवाण आणि इतर सरदार यांचे अर्धपुतळे बनवून कायमस्वरूपी त्यांचे स्मरण राहण्यासाठी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ५०