पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कीर्तिमंदिराची इमारत बांधण्यात आली. महाराजांनी फ्रान्समध्ये पॅन्थीऑन व इंग्लंडमध्ये वेस्टमिनिस्टर वे येथे असलेले 'Temple of fame' पाहिल्यावर आपल्या राज्यातही अशी इमारत असावी ज्याच्या माध्यमातून आपला दैदीप्यमान इतिहास चांगला जपता येईल. याच विचारातून महाराजांनी बडोद्यात कीर्तिमंदिराची इमारत उभारली.
 बडोद्यातील या कीर्तिमंदिराची बांधकाम शैली प्राचीन हिंदू वास्तुकलेवर आधारीत आहे. कीर्तिमंदिराच्या गोलार्धावर सूर्य आणि चंद्र यांबरोबर पृथ्वीचा गोलाकार बनविला गेला आहे. 'या पृथ्वीवर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत कीर्तिमंदिरातील महात्म्यांचे स्मरण चिरकाल होत राहणार आहे,' असा संदेश आपल्याला या शिल्पकलेतून मिळतो. हिंदू

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ५१