पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वास्तुकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या वास्तुकलेकडे पाहिले जाते. कीर्तिमंदिर हे श्रध्दा, विश्वास आणि सौंदर्य यांचे प्रेरणास्थान आहे. ते निर्माण करून महाराजांनी त्यांची इतिहासाप्रति दूरदृष्टी दाखवून दिली आहे. बडोदा राज्याचे आर्टिटेक्ट श्री. व्ही. आर. तळवळकर यांनी या इमारतीची रचना केली आहे. आतील भागाची रचना आर्किटेक्ट स्टीव्हन्स यांनी केली. ही इमारत इंडो- सॅरसेनिक वास्तुशैलीत बनवली असून ३५ मीटर उंच आहे.
 ७ फेब्रुवारी १९३६ ला कीर्तिमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, "या कीर्तिमंदिराची योजना, सदगुणांचा अभ्यास आणि आचरण यांची प्रेरणा देण्याकरिता आहे. ज्यांनी ही आचरणात आणून आपल्याला आणि संस्थानाला भूषविले असेल त्यांच्या स्मरणाकरिता आहे. सदगुणांची वाढ करा आणि खालील संस्कृत सुभाषित सदैव ध्यानात ठेवा.”
 शरीरस्य गुणांना च दूरमत्यन्तमन्तरम् ।
 शरीरं क्षणविध्वंसि कल्पान्तस्थायिनो गुणाः ॥
 (अर्थ : शरीर आणि गुण यात महदंतर असते. शरीक क्षणात नाहीसे होते, तर गुण हे कल्पान्तापर्यंत टिकतात.) (भाषण संग्रह २, भाषण क्र. २१२, पान नं ३८६)
 महाराजांवी १९९५ मध्ये स्कॉटिश नगर रचनाकार सर पेट्रिक गिडिस यांना शहर नियोजनासाठी बडोद्यात बोलावले होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ५२