पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नगर रचनाकार सर पेट्रिक गिडिस हे त्यांच्या conservative surgery म्हणजेच वास्तविक सामाजिक, एखाद्या ठिकाणची प्रतिकात्मक परिदृश्य यांचे अस्तित्वातील महत्व लक्षात घेता सर्वांत अनुकूल भविष्यातील विकास. या धर्तीवर त्यांनी बडोदा शहरातील अस्तित्वातील रचनांबाबत काही बदल सुचविले होते. याचबरोबर त्यांनी बडोद्यातील प्रसिध्द पोळबाबत पुर्नरचना करण्याचे तसेच सूरसागर तलावाचे स्थान पाहता, तेथेही नागरी मनोरंजनाच्या दृष्टीने नवीन रचनेबाबत निर्देश केल्याचे आढळते. काही मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, जोडणी व दुतर्फा वृक्षलागवड अशा अनेक छोट्या; पण महत्वाच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत. महाराजांनी यातील अनेक सूचनांचे अवलंबन केल्याचे दिसून येते. (भांड बाबा, २०१९, सयाजीरावांची ओळख, १५०)
बडोद्यातील वास्तूंवर झालेला खर्च
 बडोदा संस्थानच्या एकूण उत्पन्नापैकी दरवर्षी १५ टक्के उत्पन्न सार्वजनिक बांधकामावर खर्च करण्यात येत असल्याचे संस्थानच्या प्रशासकीय अहवालावरुन दिसून येते. यामध्ये रस्ते, पाटबंधारे, सार्वजनिक इमारती इत्यादिंचा समावेश आहे. महाराजा सयाजीरावांनी त्यांच्या कार्यकाळात बडोद्यात अनेक वास्तू निर्माण केल्या. त्यापैकि काही वास्तूंवर आलेला खर्च खाली देत आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ५ ३