पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९ २० २१ २२

सायन्स इन्स्टिट्यूट सेंट्रल लायब्ररी बडोदे हायस्कू ल ड्रेनेज काम

६.३ १.९ २.८ २५.०

टीप : वरील आकडे लाखात आहेत याची नोंद घ्यावी. वरील यादीत पाटबंधारे, रेल्वे व बडोदे शहराशिवाय राज्यातील इतर ठिकाणी बांधलेल्या इमारतींचा उल्लेख के लेला नाही. एकंदर झालेल्या खर्चाचा आकडा जवळ जवळ २१ कोटीपर्यंत गेलेला आहे. महाराजांच्या कारकिर्दीत बांधली गेलेली प्रत्येक वास्तू ही तिच्या ठाई वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असनू , आजच्या आधुनिक वास्तूंसोबत तितक्याच दिमाखाने आपले वेगळे पण जपत उभ्या आहेत. प्रत्येक वास्तू उत्तम कला आणि रचनेचे उदाहरण आहे. आजही आर्कि टे क्ट आणि वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी कित्येक लोक बडोद्यास येतात.
बडोद्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी नेऊन ठे वल्या तर बडोदे हे परदेशातच आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही. बडोद्यात अशा इमारती निर्माण करण्यामागे सबु क नगर रचना हा महाराजांचा उदात्त हेतू होता. जगावेगळ्या भक्कम इमारतींमुळे बडोदे शहर प्रगतशील शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. या सर्व वास्तूंचे बांधकाम व्यवस्थित पार पाडताना महाराजांनी निवडलले वास्तुतज्ञ, आर्कि टे क्ट, इजिनि ं यर्स आणि एकूणच

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / 55