पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संपूर्ण बांधकाम खाते यांच्याकडून कामे करून घेण्याची सयाजीरावांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. अनेकदा वेगवेगळ्या इमारतींची बांधकामे एकाच वेळी चालू होऊन जवळ जवळ एकाच तारखेला पूर्ण झालेली दिसतात. महाराजांचा एकाच वेळी अनेक कामे करण्याचा आवाका आणि विधायक कामांच्या व्यापक दृष्टीमुळे आज बडोदा शहर भारतातच नव्हे तर जगात महाराजा सयाजीराव गायकवाडांचे बडोदा म्हणून चिरकाल स्मृतीत राहणार आहे.



महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ५६