पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी कल्पना करू नका. त्यात नादिष्टपणा नाही; केवळ इतर कलेप्रमाणे नाट्यकलेला राजाश्रय देणे फार जरूर आहे व कर्तव्य आहे असे माझे मत आहे. आश्रयाच्या हुकुमांतील अटी मात्र कसोशीने पाळल्या पाहिजेत आणि त्या पलीकडे कसलीही अपेक्षा ठेवू नका." इतका स्पष्ट मथितार्थ सांगणारे महाराजांचे बोलणे होते. हे ऐकून सर्वजण थोडावेळ स्तब्ध झाले होते. "Do you understand?" या प्रश्नावर गोविंदराव टेंभे म्हणाले, Yes, Your Highness we shall try our utmost to deserve your gracious patronage.” त्यावर " That's right “ मी जातो. हे तुमचे शिरगावकर साहेब पुढची तजवीज करतील. एवढे बोलून महाराज निघून गेले.
बडोद्याचा राजाश्रय

 थोड्याच दिवसात राजाश्रयाचा खलिता आला. महाराजांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्षातून एक महिना बडोद्यास जायचे; सरकार दरबारी तीन किंवा पाच खेळ करायचे आणि पाच हजार रुपये मिळायचे. पुढेमागे कंपनीतील योग्य इसमाला युरोपास तेथील नाट्यकलेची माहिती घेण्यास पाठविण्याचा महाराजांचा मानस होता. या शेवटच्या कलमामुळे गोविंदराव टेंभेना विलायतेला जाण्याची अंधुक आशा निर्माण झाली होती. केवळ रावसाहेब शिरगावकरांच्या प्रयत्नांमुळे गंधर्व कंपनीला राजाश्रय

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / १२