पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी महाराज म्हणाले :-
 “गायनाच्या योगाने तुम्हास जरूर सांपत्तिक लाभ झाला नाही, तरी आनंद व सौख्य यांचा लाभ खात्रीने होईल."
 "If you want to measure the value of the culture of a country, look to its fine arts. Music, painting and architecture, are an index of a nation civilisation, and it is my belief, that the soul of a nation gets light and life from them."
 "कोणत्याही देशाच्या संस्कृतीची किंमत जर आपल्याला आजमावयाची असेल, तर त्या देशांतील ललितकलांकडे आपण लक्ष द्यावे. गायन, चित्रकला या राष्ट्राच्या संस्कृतीची चिन्हे आहेत व त्यांच्यापासून राष्ट्राला प्रकाश व चैतन्य प्राप्त होते असे माझे ठाम मत आहे. "
 याप्रमाणे आपल्या राज्यात कलांचा विकास व्हावा या दूरदृष्टीने महाराजांनी केलेले प्रयत्न ते कलासक्त असण्याचे मोठे उदाहरण होय. त्या प्रयत्नांच्या मुळाशी असलेली आपली कल्पना त्यांनी या संगीत परिषदेत मोजक्या शब्दांनी दर्शविली आहे. त्यात ते म्हणाले,

 "संगीत, चित्रकला वगैरे कला हिंदुस्थानच्या लोकांना आपल्या पूर्वजांपासून मिळालेला अमूल्य वारसा आहे. तो त्यांच्या मनो-भावनांशी सर्वस्वी निगडित झालेला आहे."

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / २१