पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोदा राज्यात इ.स. १८७४ अखेरपर्यंत कलावंत खाते अस्तित्वात असल्याची कुठे नोंद सापडत नाही. इ.स. १८७५ साली सयाजीराव महाराज गादीवर आल्यावर प्रथम आठ गवयांची नेमणूक होऊन कलावंत खात्याची सुरुवात झाली. त्यामुळे कलावंत खात्यास स्वतंत्र विभाग असे स्वरूप येण्यास सयाजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत सुरुवात झाली असे म्हणता येईल.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / ७