पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिल्पकार कोल्हटकर, त्रिभुवनदास गज्जर, उस्ताद मौलाबक्ष खाँ अशा अनेक जगप्रसिध्द महान कलावंत मंडळींच्या प्रगतीचा पाया बडोद्यात रोवला गेला. हे महाराजा कलासक्त असल्याचे मोठे उदाहरण होय. त्यामुळे बडोदा हे संस्थान कला आणि कलाकारांना राजाश्रय देण्यासाठी प्रसिध्द होते.
बालगंधर्व
 बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस ( देशपांडे) यांच्या गाणाऱ्या गळ्यानं कित्येक पिढ्यांना रिझवलं, खुलवलं आणि फुलवलं आहे. संगीत नाटकात आज त्यांचे नाव अजरामर झाले आहे. संगीत नाटक हे त्यांच्या जीवनाचे ध्यासपर्व होते. त्यांना रसिकांचे प्रेम भरभरून मिळाले. नारायण राजहंसचे स्वर लोकमान्य टिळकांनी ऐकले आणि त्यांनी " बालगंधर्व " ही उपाधी त्यांना बहाल केली. आजतागायत ते सर्वांच्या मनात प्रसिध्द संगीतकार बालगंधर्व म्हणूनच स्थिरावलेले आहेत. बालगंधर्वांचा जन्म पुण्यात २६ जून १८८८ रोजी झाला. १९११ पर्यंत गंधर्वांची कीर्ती सर्वत्र पसरली होती आणि १९९३ साली त्यांनी 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना केली. गंधर्व नाटक मंडळीची नाटकं जसजशी होत राहिली तशी बालगंधर्वांची लोकप्रियता कायमच वाढत गेली.

 गंधर्व मंडळीच्या धंद्याच्या सर्व गोष्टी सुरळीत चालू झाल्या होत्या. महाराज सयाजीराव गायकवाडांमुळे बडोदा संस्थान कलावंतांच्या राजाश्रयासाठी प्रसिध्दी पावू लागले होते. याच

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / ९