पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या चर्चाविश्वाच्या 'बौद्धिक पक्षाघाता'ची साक्ष देते. आधुनिक भारतात बौद्ध धर्माचा पुनर्विचार कोणत्याही संकुचित भूमिकेशिवाय बौद्ध धर्माच्या वर्ण-जात विरोधी तत्त्वज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या निकषावर करणारे सयाजीराव हे पहिले आहेत. ही बाब भारतीय समाजपरिवर्तनाच्या चळवळीने आजअखेर गंभीरपणे घेतली नाही. परिणामी जातीअंताची दिशा दाखवणारा बौद्ध धर्म आज बाबासाहेबांच्या महार जातीचा बौद्ध धर्म असा संकुचित जातीयवादी झाला आहे. ही बाब बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने धर्मांतराचा निर्णय घेतला त्या क्रांतिकारक निर्णयाचा थेट पराभवच आहे. सयाजीराव हिंदू धर्माला प्रतिक्रिया म्हणून बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करत नव्हते, तर भारतातील हिंदू धर्म आणि जात यातील गुंतागुंतीच्या व्यवस्थेला पर्याय म्हणून बौद्ध धर्माला राजाश्रय देत होते. फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंत हिंदूधर्माच्या टीकाकारांमध्ये सयाजीराव हे वेगळे ठरतात. कारण ते टोकाची नकारात्मक धर्मचिकित्सा टाळून तिचे सकारात्मक धर्मसाक्षरतेत परावर्तीत करतात.

 सयाजीरावांच्या मृत्यूपूर्वी २ वर्षे त्यांनी स्टेनले राईसच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत तुलनात्मक धर्म अभ्यासाची गरज पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत महाराज म्हणतात, “जर हिंदूंना त्यांच्या धर्माचा इतिहास शिकवला आणि त्यांच्या धर्माची इतर धर्माशी तुलना करण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण केली तर ती अतिशय चांगली बाब

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / २२