पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरेल. यामुळे लोकांची मनोवृत्ती अधिक व्यापक होऊन त्यांच्या विचारामध्ये अधिक उदारता येईल. यामुळे त्यांच्या प्रगतीला उत्तेजन मिळेल.” सयाजीरावांची ही भूमिका त्यांचा धर्म साक्षरता प्रकल्प अधोरेखित करते.
 सयाजीरावांच्या धर्मसाक्षरता धोरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळते की, त्यांनी बौद्ध धर्माला एवढा राजाश्रय का दिला होता. सयाजीरावांनंतर एवढ्या व्यापक भूमिकेतून बौद्ध धर्माचा विचार करणारा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करणारा दुसरा प्रशासक भारताच्या इतिहासात सापडत नाही. म्हणूनच बाबासाहेबांच्या बौद्ध धर्मचिंतनाअगोदर सयाजीरावांचे बौद्ध धर्मचिंतन भारताने स्वीकारले असते तर बौद्ध धर्माच्या स्वीकाराचा पाया अधिक व्यापक झाला असता. आपला समाज जातीच्या पलीकडे जाऊन जास्त 'संवादी' झाला असता एवढे मात्र नक्की.

●●●
महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / २३