पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सरकारच्या सेवेतून बडोदा संस्थानच्या सेवेत येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु काही कारणास्तव दत्त यांना त्यावेळी बडोदा संस्थानच्या सेवेत जाणे शक्य झाले नाही. मात्र १९०४ मध्ये दत्त महाराजांच्या निमंत्रणावरून बडोदा सरकारचे महसूल मंत्री बनले आणि पुढे १ जून १९०९ रोजी बडोद्याचे दिवाणदेखील झाले.
 "रोमेश चंद्र दत्त - बौद्ध धर्म - केळुसकर आणि महाराजा सयाजीराव" यांच्यातील बौद्ध धर्माच्या अनुषंगाने असणारे हे नाते फारच महत्त्वाचे आहे. १८९८ पूर्वीच सयाजीरावांचा बुद्धाशी चांगला परिचय होता याचा भक्कम पुरावा केळूस्करांच्या आत्मचरित्रात मिळतो. केळुस्करांच्या याच बुद्धचरित्रामुळे मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेबांना बुद्धाचा पहिला परिचय १९०७ मध्ये झाला. त्यावेळी बाबासाहेबांचे वय अवघे १६ वर्षे होते. केळुसकरांचे हे 'बुद्धचरित्र' बुद्धाचा 'एक वैज्ञानिक दृष्टीचा महापुरुष' म्हणून वेध घेते. हे आधुनिक भारतातील फक्त मराठीतीलच नव्हे तर कोणत्याही भारतीय भाषेतील पहिले बुद्धचरित्र होते.

 या बुद्धचरित्राचे बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनातील आणि धर्मांतराच्या निर्णयातील क्रांतिकारक स्थान आपण जाणतोच. केळुसकरांचे हे बुद्धचरित्र वाचून बौद्ध धर्म स्वीकारलेले मुंबईचे ए. एल. नायर आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात सयाजीराव महाराजांचे असणारे योगदान अधोरेखित करताना म्हणतात, "माझे महाराजांबद्दलचे महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ७

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ७