पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंगालमधील क्रांतिकारी संघटनेचे कार्य या तरुणावर सोपवून बंगालला पाठविले. पुढे १९०८ पर्यंत त्या तरुणाने वंग विद्रोहाचे काम केले.

 अरविंद घोषांचे लहान बंधू वारिन्द्र यांना बडोद्यात बोलावून आयुष्यभर स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यासाठी झटण्याची शपथ दिली. वारिन्द्रांनी गंगनाथ राष्ट्रीय विद्यालयात काही काळ प्रशिक्षण घेतले आणि ते बंगालला परतले. बडोद्यातील क्रांतिकारी अंबुभाई आणि छोडभाई हे पुराणी बंधू वारिन्द्रचे मित्र होते. हे पुराणी बंधू अरविंदांचे बंधू वारिन्द्र यांच्याकडून बॉम्ब बनविण्यास शिकले होते.

केशवराव देशपांडे

 अरविंद व खासेरावांचे मित्र केशवराव देशपांडे लंडनमध्ये बॅरिस्टर होऊन १८९३ मध्येच परतले. केशवरावांना न्यायाधीश होण्याची संधी होती; परंतु त्यांनी ती नाकारली आणि तत्कालीन ‘इंदुप्रकाश' साप्ताहिकाचे संपादकत्व स्वीकारले. केशवरावांनी अरविंद घोष यांच्याकडून इंदुप्रकाशसाठी “न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड” या नावाची लेखमाला लिहून घेतली. सयाजीरावांनी खासेराव व अरविंद यांच्या माध्यमातून केशवराव देशपांडेंना बडोद्यात बोलावले व त्यांची कलेक्टरपदी नियुक्ती केली.

 नवसारीचे कलेक्टर बॅ. केशवराव देशपांडे यांनी नवसारी येथे स्वदेशी वस्तूंचे मोठे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सयाजीरावांनी केले होते. देशपांडे प्रदर्शनाच्या निमित्ताने

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १९