पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना सांगत, “या आखाड्यातून राजद्रोही गोष्टींना मदत होते हे पुराव्यासह दाखवून द्या. मी तात्काळ त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करतो." परंतु अनेकदा प्रयत्न करूनही ब्रिटिश सरकारला माणिकरावांच्या आखाड्यात राजद्रोही पुरावे सापडू शकले नाहीत. सयाजीरावांचे भक्कम पाठबळ असल्याने माणिकराव या आखाड्याच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या क्रांतिकार्यास सहकार्य करू शकले. अरविंद घोषांनी गुजरातमधील क्रांतिकारी विचारांच्या मंडळींची 'मित्रमेळा' या नावाने संघटना सुरू केली. माणिकराव हे बडोद्यातील मित्रमेळा संघटनेचे प्रमुख होते आणि त्यांचा आखाडा त्याचे केंद्र होते. नाशिकलाही मित्रमेळा संघटनेची शाखा होती. माणिकरावांनी या शाखेतील तरुणांना मल्लविद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या आखाड्यातील इब्राहिम नावाच्या पहिलवानास नाशिकला पाठवले होते. ही मित्रमेळा संघटना १९०४ मध्ये वि. दा. सावरकरांची 'अभिनव भारत' या नावाने पुढे आली.

स्विस अकादमी

खासेराव आणि अरविंद घोषांनी महाराजांच्या सहकार्याने बडोद्यात एक महत्त्वाची क्रांतिकारी घटना घडवून आणली. खासेरावांचे लहान बंधू माधवराव जाधव हे बडोदा सैन्यात मेजर होते. माधवरावांना स्विस सैनिकी प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठविण्याची योजना बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष आणि खासेराव जाधवांनी तयार केली. स्विस अकादमीतील

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३०