पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विभागावर सोपवण्यात आल्या. भारताच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेची जबाबदारीदेखील या विभागाकडे देण्यात आली. त्याचबरोबर भारताच्या संदर्भात परकीय आणि देशविरोधी शक्तींनी आखलेल्या योजना अयशस्वी करण्याचे मुख्य काम या विभागाला नेमून देण्यात आले होते. स्वातंत्र्योत्तर भारतात २७ सप्टेंबर १९६८ ला स्थापन झालेली 'Research and Analysis Wing' म्हणजेच रॉ संस्थेच्या कार्यपद्धतीची आपल्याला कल्पना आहेच. ब्रिटिश सरकारचा गुन्हेगारी गुप्तचर विभाग याच धर्तीवर कार्यरत होता. २६ मार्च १९१४ रोजी सी. आर. क्लीव्हलँड या अधिकाऱ्याने Criminal Intelligence Office ला जमा केलेले महाराजा सयाजीरावांसंदर्भातील टिपण या विभागाच्या कार्यपद्धतीची साक्ष देते.

 २५ फेब्रुवारी १९९४ ला श्री. हॉलंड यांनी पत्राद्वारे आपल्याकडे युरोप दौऱ्यात सयाजीराव महाराज आणि त्यांच्या लवाजम्याने ज्यांचा सहवास टाळला पाहिजे अशा जहालमतवादी आणि अनिष्ठ लोकांची यादी मागितल्याचे क्लीव्हलँड या टिपणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतात. क्लीव्हलँड यांनी अशी यादी तयार करण्याचा प्रयत्न केला; परंतु युरोप दौऱ्यात महाराजांना भेटण्याची शक्यता असलेल्या जहालमतवादी व्यक्तींची संख्या खूपच जास्त असल्याने त्यांनी हा प्रयत्न सोडला. श्री. वूड या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रशासकीय सोयीसाठी

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४३