पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाच्या जहालमतवादी व्यक्तींचीच यादी करण्याचा निर्णय दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला. क्लीव्हलँड यांनी या टिपणासोबत ही यादी विभागाला सादर केली होती.

 क्लीव्हलँड यांनी या टिपणात उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या जहालमतवादी व्यक्तींमध्ये मादाम कामा, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, एडवर्ड हॉल्टन जेम्स, श्यामजी कृष्ण वर्मा, एस. के. राणा, सर वेल्टर स्ट्रीकलँड, चंपकरमण पिल्लाई, एडवर्डो डेल्गोडो, निरंजन पाल आणि जाफर अली खान यांचा समावेश होता. यातील मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा आणि जाफर अली खान हे तीन क्रांतिकारक सयाजीराव महाराजांना त्यांच्या परदेश प्रवासादरम्यान वारंवार भेटल्याचे अधिकृत पुरावे आपल्याला सयाजीरावांच्या चरित्रात सापडतात. या टिपणात क्लीव्हलँड लिहितात, “Any friends or associates of the above should be avoided. I do not mean to say that all their friends and associates are revolutionary plotters or traducers of the British Government but the majority certainly are and attempts at discrimination might be unsuccessful.” वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे मित्र अथवा त्यांच्याशी संबंधित कोणीही व्यक्ती युरोप दौऱ्यादरम्यान सयाजीराव महाराजांना भेटली नाही पाहिजे, अशी सूचना सुरुवातीला क्लीव्हलँड करतात; परंतु पुढच्याच वाक्यामध्ये या व्यक्तींशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जहालमतवादी अथवा

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४४