पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ययुगीन कालखंडात अर्ध्या भारतावर आपले राज्य निर्माण करून दिल्लीच्या तख्ताला निर्णायक हादरे देणाऱ्या शिवरायांचे अपूर्ण कामच जणू सयाजीराव पूर्ण करत होते हे सयाजीरावांनी स्वातंत्र्य चळवळीला लागेल ती मदत देऊन सिद्ध केले आहे. अस्सल पुराव्यांचा आग्रह धरणारी इतिहासकारांची जमात जेव्हा सयाजीरावांसंदर्भातील हजारो कागदांकडे दुर्लक्ष करून भारतीय स्वातंत्र्याची क्रांतिगाथा लिहितात तेव्हा या क्रांतिगाथेचा अपुरेपणा स्पष्टपणे पुढे येतो. लंडनच्या इंडिया हाउसमध्ये आजही सयाजीरावांसंदर्भातील १५० गोपनीय फायली इतिहासकारांची वाट पाहत आहेत. जेव्हा या फायलींच्या आधारे स्वातंत्र्य चळवळीतील सयाजीरावांच्या योगदानाचा शोध घेतला जाईल तेव्हा या महान देशभक्ताच्या स्वातंत्र्य समर्पणापुढे अख्खा देश नतमस्तक होईल.


●●●
महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४७