पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सार्वभौम राजे: सयाजीराव

 १८०२ मध्ये बडोद्याच्या गायकवाडांनी ईस्ट इंडिया कंपनीशी मैत्रीचा करार केला. या तहामुळे बडोदा सरकार इंग्रजांचे मांडलिक न होता मित्र झाले. हाच तहनामा ब्रिटिश सरकारने पुढे स्वीकारला. २७ मे १८७५ ला राज्यारोहण झालेल्या सयाजीरावांच्या औपचारिक शिक्षणादरम्यान त्यांचे शिक्षक एफ. ए. एच. इलियट यांनी सयाजीरावांना ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोदा सरकारमधील १८०२ चा मैत्रीचा करार समजावून सांगितला. पुढे १८८१ ला प्रत्यक्ष राज्यकारभाराची सूत्रे हाती आल्यानंतर सयाजीरावांनी इंग्रजांशी असलेला मैत्रीचा करार पुन्हा तपासून बघितला. तेव्हापासून आपण इंग्रजांचे मांडलिक नसून मित्र आहोत ही सार्वभौमत्वाची भावना सयाजीरावांमध्ये रुजली.

 तत्कालीन भारतापैकी ७५% भारत हा ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता. तर केवळ २५% भारतावर संस्थानिकांची हुकूमत होती. ब्रिटिश हुकमत असलेल्या भागांवर ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे लागू होते. मात्र हे कायदे उर्वरित संस्थानांना लागू होत नसत. असे कलम ब्रिटिश व संस्थानिकांच्या मूळ करारात सामील होते. या बाबीचा अभ्यास सयाजीरावांनी केला होता. त्याचबरोबर पुण्यातील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले आणि रामकृष्ण भांडारकरांसारख्या सामाजिक सुधारणांच्या नावाखाली ब्रिटिश सत्तेविरुद्ध कार्य करणाऱ्या

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ८