पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खाजगी डॉक्टर होते. त्यांच्याकडे महाराजांनी इच्छा व्यक्त केली की यंदे यांनी बडोद्यास यावे आणि स्वतंत्र विचाराचे वर्तमानपत्र सुरू करावे. त्यानुसार डॉक्टर शिवाप्पा यांनी यंदे यांची भेट घेतली आणि यंदे यांना बडोद्यास बोलावून घेतले. पहिल्याच भेटीत यंदेंनी सयाजीराव महाराजांच्या इच्छेनुसार असे वृत्तपत्र सुरू करण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली.

 १८८३ मध्ये सत्यशोधक रामचंद्र विठोबा धामणस्कर हे बडोदा संस्थानात नोकरीस आल्यानंतर महाराज आणि धामणस्करांमध्ये सत्यशोधक तत्त्वज्ञानावर विचारविनिमय होत असे. १८८४ ला रामचंद्र धामणस्कर यांना मामा परमानंदांच्या शिफारशीवरून महाराजांनी बडोदा संस्थानच्या प्रशासनात सरसुभे या पदावर नियुक्त केले. सयाजीरावांना आपल्या राज्यात एखादे दर्जेदार वृतपत्र असावे असे वाटत होते. त्यानुसार दिवाण रामचंद्र धामणस्कर यांनी रामजी संतुजी आवटे यांची या कामी निवड केली. त्यानुसार आवटे आणि यंदे या दोघांनी ‘बडोदावत्सल' हा छापखाना बडोदा येथे सुरू करून ११ ऑक्टोबर १८८५ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर 'बडोदावत्सल' हे साप्ताहिक सुरू केले. हे दर रविवारी प्रकाशित होई आणि मराठी, गुजराथी व हिंदी या तीन भाषेत यातील 'मजकूर येई. या पत्रात येणारे सर्व लेख महाराज नियमित वाचत असत आणि

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १२