पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याचा खप दहा हजारपर्यंत गेला होता यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येते. यासंदर्भात यंदे म्हणतात, "या उत्कर्षाचे सर्व श्रेय श्री. महाराजांकडे आहे. याचे कारण असे कीं, श्रीसयाजीविजय पत्रात येणारा मजकूर महाराज स्वतः वाचतात व त्यातील सूचनांची चौकशी लवकर होऊन लोकांच्या गाण्यांची दाद लागते. ही परिस्थिती लोकांच्या लक्षात येतांच लोकांत वर्तमानपत्र वाचण्याची गोडी उत्पन्न झाली व पत्राच्या हजारों प्रती खपूं लागल्या.” जागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या जडणघडणीवर 'श्रीसयाजीविजय' मधील लेखनाचा मोठा प्रभाव होता. 'सयाजीविजय' हे मराठी लोकांचे खूप आवडते वर्तमानपत्र ठरले होते. विशेष म्हणजे १९५० च्या सुमारास 'सयाजीविजय' छापणारी यंत्रसामग्री लोकसत्ता, जनसत्ता या पत्रकाने विकत घेतली.
जागृति साप्ताहिक

 २५ ऑक्टोबर १९१७ रोजी मराठा शिक्षण परिषदेच्या प्रचारकार्यासाठी भगवंतराव पाळेकरांनी बडोदा येथून 'जागृति' नावाचे साप्ताहिक सुरू केले. 'जागृति'मध्ये अग्रलेख, विविध विषयांवरील • स्फुट लेख, स्फुट विचार, पोच, अभिप्राय इ.चा समावेश असे. ‘जागृति' हे समतोल विचारांचे साप्ताहिक होते. 'जागृति'मध्ये स्थानिक प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा प्रसिद्ध होत असे. 'जागृति' ने राजकीय,

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १५