पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेती, सहकार, व्यायाम, उद्योग, आरोग्य, प्राच्यविद्या इ. विविध क्षेत्रातील अचूक ज्ञान नियतकालिकांच्या माध्यमातून प्रजेपर्यंत पोहोचवून प्रजेला ज्ञानी बनविले. सयाजीरावांनी माहिती आणि प्रबोधनाचा अचूक मेळ घालत वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिले. बडोदा संस्थानात एक आदर्शवत असे पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी या क्षेत्रात निर्माण केले. सयाजीरावांनी पत्रकारितेला पाठबळ देत असताना वृत्तपत्रांबरोबरच साहित्य, संस्कृती, धर्म, आरोग्य, शेती, सहकार अशा विविध आणि समाजाच्या चौफेर विकासाला बळ देणाऱ्या नियतकालिकांनाही पाठबळ दिले ही बाब १०० वर्षांपूर्वी जेवढी नावीन्यपूर्ण होती तितकीच आजही नवी वाटावी अशी आहे.

●●●
महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / २२